दंत जागृती – 1
देवाने 32 दात दिले खरे पण एक एक दात खूप महत्त्वाचा आहे.
“मॅडम माझ्या तीन वर्षाच्या युवराज चे दात खूप किडले आहेत काय करायचं” असे पालकांचे संवाद काळजीयुक्त स्वरात नेहमी मला ऐकायला भेटतात. मी डॉक्टर प्रियंका पाटील गेले पंधरा वर्षे झाले दंतचिकित्सक अथवा डेंटिस्ट म्हणून चिंचवड,पुणे येथे कार्य करतआहे.
दातांची काळजी ही लहानपणापासूनच घेणं खूप गरजेचे आहे. जन्म झाल्यापासून ही काळजी घ्यावी लागते.
” आरोग्य हीच संपत्ती”( Health is Wealth)” मधला आरोग्य ची सुरुवात तोंडापासूनच होते.
पचनक्रियेमध्ये दातांचा खूप मोठा हातभार असतो. आणि त्यासाठीच दर आठवड्याला दंतजागृती ही लेखमाला खास तुमच्यासाठी चालू करत आहे.
” उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे”(प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर) हे ब्रीद वाक्य आपल्याला दात,शरीर,पासून बाकी सर्व गोष्टींसाठी लागू पडते.
म्हणूनच दंतजागृती ह्या प्रिव्हेंटिव्ह त्याबरोबरच माहितीपूर्ण लेखमाला मी चालू करत आहे तुम्हाला दंत जागृती नक्कीच खूप उपयोगी पडेल .त्याशिवाय तुमचे काही एक प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता..
मी आशा करते ही लेख माला तुम्हाला नक्कीच आवडेल मला तुमचा अभिप्राय ऐकायला नक्की आवडेल.
Dr Priyanka Sonawane Patil
Sparkle dental and facial esthetic clinic, chinchwad, Pune 33
9762002877
दंत जागृती 2
दंत जागृती दोन या लेखमालेमध्ये नवजात शिशुच्या हिरड्यांची काळजी घेण्यापासून वय वर्ष 12 पर्यंत कशी काळजी घ्यावी याची माहिती मी या लेखात आज देणार आहे.
नवजात शिशु म्हणजे शून्य महिने ते सहा महिने जोपर्यंत दात येत नाहीत तोपर्यंत प्रत्येक वेळी फीडिंग करून झालं की, कोमट पाण्यात कॉटन अथवा कॉटनचा स्वच्छ कपडा बुडवून बाळाच्या हिरड्या स्वच्छ पुसून घेणे पुसताना जास्त दाब देऊ नये.
रात्रीच्या वेळेस फीडिंग करताना अथवा दूध पाजून झाल्यावर, बाळ खूप लहान असेल तर बाळाच्या हिरड्या शेवटी पुसून घ्याव्यात, आणि बाळ जर मोठे असेल तर, पाणी पाजून रात्री ब्रश करून घेणे. जेणेकरून बाळाला baby bottle syndrome अथवा nursing caries होणार नाही.baby bottle syndrome मध्ये झोपताना जर दुधाचा शेवटचा घोट बाळाच्या तोंडात राहिला तर..नवीन येताना दात किडलेले येतात .
सहा महिन्यापासून जसे दात यायला लागले की आपण फिंगर ब्रश अथवा लहान मुलांचे ब्रश वापरू शकतो जे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत,तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे वापरू शकता, सिलिकॉन ब्रश पण येतात तुम्ही तेही वापरू शकता सिलिकॉन ब्रश बऱ्यापैकी सॉफ्ट असतात. अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या नियमाप्रमाणे सहा महिने ते दोन वर्षापर्यंत टूथपेस्ट flouride फ्री वापरावी कारण की लहान मुलांना चूळ भरता येत नाही आणि ते थुंकी गिळून घेतात..अश्या वेळी तुम्ही ब्रश आणि पाणी पण वापरू शकता. जर फ्युराईड फ्री टूथपेस्ट वापरायची असेल तर अगदी कमी प्रमाणात वापरायचे असते अगदी छोटासा थर टूथब्रश वर लावायचा आणि आणि ब्रश करायचा.
आता ब्रश कसा करायचा-
बाळ सहा महिन्याचा असेल तर त्याला छातीशी धरून अलगदपणे फिंगरब्रश ने किंवा सिलिकॉन ब्रशने छोटासा टूथपेस्टचा थर टूथ ब्रशवर लावून हलका हलका ब्रश लावून घ्यायचा आणि तुम्हीच थोडंसं थुंकून दाखवायचा मुलांना . लहान मुलं खूप वेळा आई-वडिलांना फॉलो करत असतात मग तुम्ही जेव्हा ब्रश करता ते सुद्धा तुम्हाला बघुन शिकतात.बाळाला बसता येत असेल तर बसून करायचा अगदी झोपून फक्त करू नका.
दोन वर्षापासून सहा वर्षापर्यंत ह्या वयात जवळ पास सगळे दात आता आलेले असतात तर ह्या वेळेस ब्रश करताना तुम्ही मुलांना घेऊनच ब्रश करायचा तुम्ही कसे ब्रश करतात ते बघून शिकतात. ह्या वेळेस
पेरेंट्स ने दोन टाईम ब्रश करायचा म्हणजे मुलं सुद्धा दोन टाईम ब्रश करायला शिकतात. रात्रीच्या ब्रशिंग खूप इम्पॉर्टंट आहे.
आता दोन वर्षाच्या पुढे सहा वर्षापर्यंत आता १००० पीपीएम fluoride असलेले टूथपेस्ट आपण वापरू शकतो. दोन वर्षाच्या पुढे टूथपेस्ट हलकासा थराएवढी घ्यावी. मार्केटमध्ये खूप सारे लहान मुलांचे टूथपेस्ट आता उपलब्ध आहेत आपण त्यातला कुठलाही निवडू शकतो.
सहा ते बारा वर्षापासून आपण 1450 किंवा दीड हजार ppm असलेली फ्लोराईड टूथपेस्ट वापरू शकतो , सहा वर्षापासून वटाण्याच्या एवढी टूथपेस्ट टूथब्रशवर लावावी.लहान मुलांना जर दोन वेळ ब्रशिंगची सवय असेल तर बरेच प्रकारचे दंतविकारचा निर्बंध होऊन शकतो .
सहा महिन्यापासून जसे दुधाचे दात यायला चालू होतात , तसे डेंटिस्ट कडे जाऊन दर सहा महिन्याला चेकअप करून घेणे गरजेचे आहे.जेणेकरून सुरुवातीला जर दांतविकर असतील तर त्याचे फिलिंग वगैरे करून किंवा तेव्हाच्या तेव्हा उपचार उपलब्ध करून देता येतात.
पुढच्या दंत जागृती लेखमालिकेत ब्रश कसा करायचा ह्याच्यावर मी लिखाण करणार आहे…
हा लेख कसा वाटला त्या बद्दल आपला अभिप्राय जरूर कळवावा..
डॉक्टर प्रियंका सोनवणे पाटील.
डेंटल सर्जन.
दंत जागृती 3
नमस्ते मी डॉक्टर प्रियंका सोनवणे पाटील पिंपरी चिंचवड मध्ये गेले पंधरा वर्षे डेंटल सर्जन,क्लिनिकल smile designer , क्लीनिकल इम्प्लांटोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे.
दंतजागृती या लेखमाले द्वारे व व्हिडिओद्वारे दातांचे व मौखिक आरोग्य याबद्दल प्रचार व प्रसार करत आहेत, जेणेकरून लोकांमध्ये मौखिक व दातांचे आरोग्य याबद्दल जागृती वाढेल .
मागील काही भागांमध्ये आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्यानंतर ब्रशिंग टेक्निक ,रूल ऑफ २-२-२ ह्याबद्दल माहिती घेतली.
दंत जागृती ह्या तिसऱ्या लेखमालेद्वारे आपण दातांना कीड कशी लागते ,त्याबरोबरच योग्य ते उपचार पद्धती बद्दल बोलणार आहोत .
दातांना कीड लागण्यासाठी खूप सार्या गोष्टी जबाबदार आहेत.
पण महत्त्वाचे आहे ते म्हणजे.
आहार_
-कार्बोहायड्रेट रिच फूड अथवा कार्बोदक असलेले अन्न ,अति गोड जेवण अथवा अति चिकट जेवण यामुळे दात किडण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतात . लाळे मध्ये असलेले एंजाइम्स हे कार्बोहायड्रेट अथवा कार्बोदकांचे रूपांतर करून त्यांना सिम्पलर शुगर मध्ये बदलतात,त्यामुळे दातांना कीड लागण्याचे प्रमाण वाढत जाते ,त्यामुळे आहारात अति गोड व अति चिकट, पदार्थाचे सेवन कमी केल्यास व जेवण झाल्यानंतर लगेच चूळ भरणे व दोन वेळा ब्रश केल्यास की दात किडण्याचे प्रमाण कमी होते.
दुसरे कारण पण आहारच आहे
ज्यामध्ये हेल्दी फूड नसल्यामुळे आहारांमध्ये जीवनसत्व अथवा मल्टी विटामिन्स कमी असल्यामुळे स्पेशली विटामिन ए आणि कॅल्शियम याच्या कमतरता असल्यामुळे दात आणि हाडे ठिसूळ होतात. जीवनसत्व अथवा मल्टी विटामिन च्या कमतरतेमुळे दातांचे व हिरड्यांचे आरोग्य धोक्यात येते. म्हणून जेवताना हेल्दी फूड अथवा संपूर्ण पोषक आहाराकडे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर आपल्याला काही आजार असणे,
आपली इम्युनिटी कमी झालेली असणे, किंवा कॅन्सर यासारख्या रोगांमुळे सुद्धा दातांचे आरोग्य खालवले जाते. त्यासाठी त्या आजारांवर किंवा डिसऑर्डर वर योग्य ते उपचार करणे अत्यंत गरजेचे असते.
त्याचबरोबर ज्यांना पोटांचे विकार आहेत, जी इ आर डी, स्टमक अल्सर,अन्नपचन नीट न होणे ,ह्या गोष्टींमुळे सुद्धा तोंडाला वास येणे आणि दातांचा इनामल हा लेअर झिजणे, आणि त्याबरोबरच बाकीचे दंत विकार होणे ह्या गोष्टी होतात. त्यासाठी योग्य ते उपचार घेणे गरजेचे असते.
तसेच जसे आपले वय होते किंवा वयोवृद्ध पेशंटला लाळ कमी होण्याचे प्रमाण चालू होतं आणि लाळ कमी झाल्यामुळे दात किडण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढते त्यासाठी सुद्धा योग्य ते ट्रीटमेंट घ्यावी लागते.
त्यानंतर दात स्वच्छ न करणे जेवणानंतर ब्रश न करणे ,चूळ न भरणे, यामुळे सुद्धा दातांचे अथवा मौखिक आरोग्य धोक्यात येते .
इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये दातांचे आरोग्य व मौखिक आरोग्य याकडे दुर्लक्ष अथवा योग्य माहिती नसणे हे सुद्धा मुख्य कारण आहे, हे निदर्शनास आले.
सगळ्यांनी आरशात आपण आपला चेहरा बघतो, कपडे बघतो, त्याप्रमाणे आपले दात व जीभ हे देखील बघावे. एक किडलेला दात आपल्या तोंडांमध्ये ” पावर हाऊस ऑफ मायक्रो ऑरगॅनिझम “अथवा “किटाणूंचे घर” म्हणून कार्य करतात. त्या एका दातामध्ये शेकडो किटाणू असतात, व तेच किटाणू लाळे मध्ये जाऊन लाळेचे पीएच कमी कमी झाल्यामुळे, तोंडामध्ये किटाणू वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे एका दाता नंतर, दुसरा दात , तिसरा असे कीड लागण्याचे प्रमाण वाढत जाते. यासाठी दर सहा महिन्यांनी तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन प्रत्येकाने आपल्या किडलेल्या दातांची योग्य ती ट्रीटमेंट करून घ्यावी.
ह्या लेखात एवढेच पुढे दंतजागृती लेखांमध्ये दातांच्या आधुनिक ट्रीटमेंट बद्दल माहिती घेऊन येते तर धन्यवाद.
डॉक्टर प्रियंका सोनवणे पाटील,
स्पार्कल डेंटल अँड फेशिअल इस्टेटिक क्लिनिक,
पिंपरी चिंचवड, पुणे ३३,
9762002877.
(अधिक माहितीसाठी स्पार्कल डेंटल अँड फेशियल एस्थेठीक क्लिनिक इथे अपॉइंटमेंट घेऊन संपर्क साधावा)
हा भाग इथेच सुफळ आणि संपूर्ण.
दंतजागृती भाग चौथा
नमस्कार मी डॉक्टर प्रियंका सोनवणे पाटील गेले 18 वर्ष क्लीनिकल डेंटिस्ट, इम्प्लांटोलॉजिस्ट ,कॉस्मेटिक डेंटिस्ट, स्माईल डिझाइनर म्हणून पिंपरी चिंचवड भागात कार्यरत आहे.
आत्तापर्यंत दात आणि मौखिक आरोग्य कसे चांगले ठेवता येईल ह्यावर मी आतापर्यंत तीन लेख लिहिले,ज्यामध्ये प्रिव्हेन्शन म्हणजे दांत किडू नये ह्यासाठी आपल्याला काय काय करता येईल याबद्दल विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. हा चौथा लेखजर दातांचे आणि मौखिक आरोग्य खराब झाले तर काय करता येईल यासाठी आहे.
जर दातांना कीड लागली तर सुरुवातीच्या भागांमध्ये काय करता येईल ह्यावर हा लेख आहे.
दांताला तीन प्रकारचे लेअर किंवा कवच असतात. त्याला इनामल ,डेंटीन आणि पल्प असे म्हणतात .जर सुरुवातीला किड इनामल (enamel)आणि डेंटीन(dentin) ह्या भागाला लागली असेल तर फिलिंग किंवा रेस्ट्युरेशन(restoration )करता येते.
जेव्हा मूल सहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यावेळेस आम्ही लहान मुलांना जे नवीन दात येतात त्या दातांना पीट आणि फिशर म्हणून सिलंट असतात ते लावतो जेणेकरून दातांच्या आत मध्ये जो नॅचरल एक खड्डा असतो तो खड्डा भरून येतो आणि तिथे अन्न अडकणे किंवा तिथे अन्न कुजून तिकडचा दात किडत नाही.
परंतु भरपूर असे पालक सुरुवातीला ह्या स्टेजला लहान मुलांच्या दातांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे हळूहळू लहान मुलांचे पक्के किंवा परमनंट दांत किडायला चालू होतात .
लहान मुलांचे किंवा मोठ्यांचे सुद्धा जेव्हा दांत किडतात आणि ती कीड दाताच्या पहिल्या लेयर मध्ये म्हणजे इनॅमल मध्ये जेव्हा असते तेव्हा आपल्याला ती कीड काढता येते आणि त्या कीड लागलेल्या जागेवर मशीनच्या साह्याने एक खड्डा करावा लागतो आणि त्या खड्ड्यांमध्ये आपल्याला फिलिंग किंवा रेस्टोरेशन करता येते.
फिलिंग चे तीन ते चार प्रकार येतात सगळ्या चांगल्या प्रकारचे फिलिंग एक कंपोझिट म्हणून आहे जे एक नॅनो रेझिन असते त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार असतात तुम्ही तुमच्या जवळच्या डेंटिस्ट कडे गेला तर ते तुम्हाला ते सगळे प्रकार सांगते जर तुम्हाला कंपोझिट नसेल करता येत तर थोडेसे बजेट फ्रेंडली ऑप्शनही अवेलेबल असतात जेणेकरून जीआयसी(Gic), चांदी , चांदी आणि सिमेंट मिक्स करता येते.आपल्याला त्यानंतर आपल्याला शेवटचा ऑप्शन आहे तो चांदी त्याला आम्ही सिल्वर अमलगम(silver amalgam )असं बोलतो तो सुद्धा ऑप्शन आहे पण आजकाल , चांदी हा ऑप्शन खूप कमी प्रमाणात वापरला जातो, कंपोझिट आणि जीआयसी हे जास्त ऑप्शन्स वापरले जातात.
पण कीड जर पहिला लेयर जो इनामल, तो सोडून जर इनॅमल आणि डेंटिन ह्या दोन भागाला लागली, त्यावेळेस मात्र काळजी जास्त घ्यावी लागते ,डायरेक्ट फिलिंग करून होत नाही त्या केसेस मध्ये कीड काढून, अगोदर आत मध्ये बेस किंवा औषधी सिमेंट टाकावा लागतो. जो बेस, औषधी सिमेंटचाही असू शकतो, जेणेकरून तुमच्या दात फीलिंग केल्यानंतर रूट कॅनला जाऊ नये म्हणून तो एक प्रोटेक्टिव्ह बेस आपण लावतो ,आणि तो बेस लावून मग वरून तुम्हाला परत कंपोझिट, जीआयसी, चांदी, चांदी प्लस सिमेंट हे ऑप्शन्स असतात.
पुढच्या भागांमध्ये जर तुम्ही कीड लागली आहे ,त्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं,कारण की जेव्हा किड लागते तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुखणे नसते.सुरुवातीला जेव्हा कीड असते तेव्हा फक्त तिथे अन्न अडकतात पण जेव्हा किड तुम्हाला प्रॉपर रक्तवाहिनी आणि नस (pulp)मध्ये जाते तेव्हा मात्र तुम्हाला दुखायला लागतो .आणि तेव्हा मात्र दांत फिलिंग किंवा रेस्टॉरेशन करण्याच्या पलीकडे जातो.
आणि तेव्हा काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत त्यासाठीचा लेख मी पुढे लिहून काढेन, तुमच्या दात रूट कॅनला जातो पुढच्या भागात मी रूट कॅनल बद्दल तुम्हाला विस्तृत माहिती देईल जर ह्याच्याबद्दल अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद.
अशा प्रकारचा अशाप्रकारे दंतकथाचा चौथा भाग सफल संपूर्ण .
डॉक्टर प्रियंका सोनवणे पाटील
चिंचवड पुणे.
9762002877
